Adivasi Army Bharti Process – Commissioner Leena Bansod of the Tribal Development Department has taken a significant step to provide tribal youth with the opportunity to join the Indian Armed Forces for Adivasi Army Bharti Process. Taking note of the demand made by former MLA and Chairman of the Tribal Development Review Committee (Ministerial Rank), Vivek Pandit, the Commissioner has directed that positive action be taken to start ‘Agniveer pre-recruitment training’ for tribal youth. This will pave the way for tribal young men and women from remote areas to serve the nation. The Tribal Development Department currently provides free training to tribal youth for police recruitment. However, no such separate training was available for the ‘Agniveer’ scheme in the armed forces. Despite having the necessary physical capabilities, young people from remote areas were falling behind in the recruitment process due to a lack of proper guidance under Adivasi Army Bharti Process & Adivasi Sanya Bharti . Considering this, Vivek Pandit had requested this training through a letter on December 23, 2025. Commissioner Leena Bansod of the Tribal Development Department acted on this proposal and instructed the secretaries via email. Accordingly, Agniveer training will be included in the existing police recruitment training centers. It will provide in-depth guidance on physical tests, written examinations, and medical criteria. Expert trainers will impart lessons on military discipline and technical preparation to the tribal youth.
आदिवासी भागातील तरुणांना भारतीय सैन्यदलात भरती होण्याची संधी मिळावी, यासाठी आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. माजी आमदार तथा आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) विवेक पंडित यांनी केलेल्या मागणीची दखल घेत, आयुक्तांनी आदिवासी युवकांसाठी ‘अग्निवीर भरतीपूर्व प्रशिक्षण’ सुरू करण्याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे दुर्गम भागातील आदिवासी तरुण-तरुणींचा देशसेवेचा मार्ग सुकर झाला आहे. आदिवासी विकास विभागामार्फत सध्या पोलीस भरतीसाठी आदिवासी युवक-युवतींना विनामूल्य प्रशिक्षण दिले जाते. मात्र, सैन्यदलातील ‘अग्निवीर’ योजनेसाठी अशा प्रकारचे कोणतेही स्वतंत्र प्रशिक्षण उपलब्ध नव्हते. दुर्गम भागातील तरुणांकडे शारीरिक क्षमता असूनही केवळ योग्य मार्गदर्शना अभावी ते भरती प्रक्रियेत मागे पडत होते. ही बाब लक्षात घेऊन विवेक पंडित यांनी २३ डिसेंबर २०२५ रोजी पत्राद्वारे या प्रशिक्षणाची मागणी केली होती. आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड यांनी या प्रस्तावावर कार्यवाही करत सचिवांना ई-मेलद्वारे सूचना केल्या आहेत. त्यानुसार विद्यमान पोलिस भरती प्रशिक्षण केंद्रांमध्येच अग्निवीर प्रशिक्षणाचा समावेश केला जाणार आहे. यात शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा आणि वैद्यकीय निकषांबाबत सखोल मार्गदर्शन दिले जाईल. तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून आदिवासी तरुणांना सैन्यदलातील शिस्त आणि तांत्रिक तयारीचे धडे दिले जातील.

ग्रामीण आणि अतिदुर्गम भागातील आदिवासी तरुणांमध्ये सैन्य सेवेबाबत मोठी ओढ आहे. आता शासकीय स्तरावर अधिकृत प्रशिक्षण सुरू झाल्यामुळे त्यांना खासगी शिकवण्यांवर अवलंबून रहावे लागणार नाही. विवेक पंडित यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निर्णय मार्गी लागल्याने आदिवासी समाज आणि युवावर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.
=====================
आदिवासी युवकांमध्ये अफाट जिद्द आणि शारीरिक क्षमता आहे. त्यांना केवळ योग्य संधी आणि मार्गदर्शनाची गरज होती. ‘अग्निवीर’ प्रशिक्षणाच्या निर्णयामुळे देशाच्या संरक्षणात आता आदिवासी तरुणांचा सहभाग अधिक वाढेल.
– विवेक पंडित, अध्यक्ष, (मंत्री दर्जा) आदिवासी विकास आढावा समिती