Indian Railway Bharti 2026 Apply online – As per the Latest News, Indian Railway Recruitment or Bharti for More that 2 Lac Vacancies will begin soon. There are 260,000 vacant positions in the railway department across the country, which the railway department has failed to fill under Indian Railway Bharti 2026 . Not a single new post has been created. Railway employees have various issues and problems, including the approval of posts, filling of vacancies, and promotions. A plan of action to address these issues will be prepared at the biennial convention of the Central Railway Mazdoor Sangh (CRMS) being held in Solapur, informed Dr. M. Raghavayya, General Secretary of NFIR, at a press conference. The biennial convention of the Central Railway Mazdoor Sangh (CRMS) is being held in Solapur from February 2nd to 4th in Indian Railway Bharti 2026. While in Solapur for the convention, Dr. M. Raghavayya highlighted the various issues and problems faced by railway employees across the country. These various issues will be discussed at the railway employees’ convention in Solapur about Indian Railway Bharti 2026 Jobs.
Indian Railway Bharti 2026 Details – देशभरात रेल्वे विभागामध्ये २ लाख ६० हजार जागा रिक्त आहेत. त्या भरण्यात रेल्वे विभाग अपयशी ठरले आहे. एकही नवीन पद निर्माण केले नाही. पदे मंजुरी, रिक्त जागा भरणे, पदोन्नती करणे यासह रेल्वे कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न आणि समस्या आहेत. या मोठ्या होणाऱ्या भरती मुळे पुढे भविष्यात लाखो उमेदवारांना नोकरीच्या संधी मिळणार आहे. तसेच या नवीन रोजगार संधी मुळे रेल्वेत नोकरी मिळवण्याचे स्वप्न लाखो उमेदवारांचे पूर्ण सुद्धा होणार आहे. यात १० वी आणि १२ उमेदवाराने सुद्धा नोकरीच्या मोठ्या संधी मिळणार असल्याचे समजते. यात ट्रकमन, वाट्चमन, लोको पायलट आणि अन्य विविध पदाचा समावेश आहे. आता हि भरती नेमकी कधी पासून सुरु होणार हे लवकरच समजणार आहे. या संदर्भातील माहिती आम्ही MahaExam.in या संकेतस्थळावर प्रकाशित करूच. तसेच या रिक्त पदाच्या समस्या सोडविण्यासाठी होणाऱ्या सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या द्विवार्षिक अधिवेशनात एक कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती एनएफआयआरचे जनरल सेक्रेटरी डॉ. एम राघवय्या यांनी पत्रकार परिषदेत दिली. सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे (CRMS) सोलापुरात द्विवार्षिक अधिवेशन दि. २ ते ४ फेब्रुवारी या दरम्यान सोलापुरात आयोजित करण्यात आले आहे. त्यासाठी आले असताना डॉ. एम राघवय्या यांनी रेल्वे विभागातील देशभरातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्न आणि समस्या मांडल्या. सोलापुरातील रेल्वे कर्मचाऱ्यांच्या अधिवेशनामध्ये विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात येणार आहे. आणि हो पुढील पोलीस भरतीचे प्रश्नसंच टेस्ट सिरीज नवीन पॅटर्न नुसार या लिंक वर उपलब्ध आहे.

समस्या निराकरणासाठी कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर कोअर कमिटीमध्ये चर्चा करून दिशा ठरविण्यात येईल. देशभरात सुमारे २२ हजार रेल्वेगाड्या धावतात. सद्यस्थितीत विविध ३२० विभागात १३ लाख रेल्वे कर्मचारी कार्यरत आहेत तर १४ लाख निवृत्त रेल्वे कर्मचारी आहेत. १९ हजार किलोमीटर नवीन रेल्वे मार्गाची निर्मिती करण्यात आली आहे. अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. असे असतानाही देशभरात रेल्वे विभागामध्ये २ लाख ६० हजार कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. त्या भरण्यास रेल्वे मंत्रालय अपयशी ठरले आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. अनेक समस्यांना कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागते. रेल्वे विभाग नफ्यामध्ये आहे. देशाच्या संरक्षण विभाग आणि रेल्वे विभागातील कर्मचाऱ्यांच्या पेन्शन योजना समकक्ष आहेत. आठव्या वेतन आयोगासाठीही पाठपुरावा सुरू आहे, अशी माहिती डॉ. एम राघवय्या यांनी पत्रकार परिषदेत दिली.
तसेच मित्रांनो, रेल्वेमधील नोकरी मिळवण्यासाठी पात्रतेसाठी सामान्यतः उमेदवारांचे वय १८ ते ३६ वर्षे असावे आणि ते भारतीय नागरिक असावेत. शैक्षणिक पात्रतेमध्ये ग्रुप डी पदांसाठी १०वी उत्तीर्ण/आयटीआय पासून ते एनटीपीसी पदांसाठी पदवीपर्यंतच्या पात्रतेचा समावेश असतो. महत्त्वाच्या आवश्यकतांमध्ये वैद्यकीय परीक्षा उत्तीर्ण होणे, विशिष्ट पदांसाठी शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) आणि संगणक-आधारित चाचणी (CBT) यांचा समावेश आहे. या संदर्भातील पूर्ण माहिती या लिंक (Indian Railway 10th Pass Job Bharti Details)वर उपलब्ध आहे.