Pune Police Bharti Ground Exam Date and Admit Card
Pune Police Bharti Ground Exam Date and Admit Card: The Pune Police recruitment process is set to begin on February 16, 2026. With over 1.39 lakh candidates competing for various positions, staying updated on your admit card is crucial. Based on the official announcement, here is the step-by-step guide to navigating the process for Pune Police Bharti Ground Exam Date and Admit Card. Since the exam starts on the 16th, admit cards are usually released 5–7 days prior. Keep checking your registered mobile number for the official SMS alert.
पुणे शहर पोलिस दलातील पोलिस भरतीप्रक्रियेची सुरुवात १६ फेब्रुवारीपासून होणार आहे. पुणे पोलिस दलातील १६३३ पोलिस शिपाई, १०५ वाहनचालक, ३३ बँडमन अशा जागांसाठी एक लाख ३९ हजार उमेदवारांनी, तर कारागृहातील १३३ शिपाईपदासाठी ४६ हजार उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
पोलीस भरतीची फिजिकल कशी होणार, पूर्ण माहिती आणि महत्वाची माहिती – Police Bharti Physical Information
शिवाजीनगर पोलिस मुख्यालय तसेच रामटेकडीतील राज्य पोलिस दलाच्या (एसआरपीएफ) मैदानावर भरतीप्रक्रियेसाठी मैदानी चाचणी पार पडणार आहे. १६ फेब्रुवारीपासून शारीरिक चाचणी सुरू होणार असून, त्यानंतर लेखी परीक्षा होईल. भरतीप्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी पोलिसांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त संजय पाटील यांनी दिली. ‘मैदानी चाचणीनंतर पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येणार असून, भरतीप्रक्रियेचे वेळापत्रक टप्याटप्याने जाहीर केले जाणार आहे.
Pune Police Bharti Physical Exam Date 2026

Pune Police Bharti Ground Admit Card
अधिकृत संकेतस्थळ, संदेशाद्वारे उमेदवारांना माहिती दिली जाणार आहे. शारीरिक चाचणीत उमेदवारांची छाती, उंची मोजण्यात येणार आहे. १०० मीटर, १६०० मीटर धावणे (महिला उमेदवारांसाठी ८०० मीटर), गोळाफेक अशा घटकांचा समावेश असणार आहे. भरतीप्रक्रियेत गैरप्रकार होऊ नये म्हणून ‘आरएफआयडी’ तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. संपूर्ण भरतीप्रक्रिया सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली होणार आहे. त्यामुळे उमेदवारांची धावण्याची वेळ, चाचणीतील कामगिरी याची अचूक वेळ नोंदवता येणार आहे, असे अतिरिक्त आयुक्त पाटील यांनी नमूद केले.
भूलथापांना बळी पडू नका
लेखी परीक्षेच्या टप्प्यात विशेष उपायोजना करण्यात येणार आहे. लेखी परीक्षा घेणाऱ्या अधिकाऱ्यांना मोबाईल वापरण्यास मनाई आहे. परीक्षेच्या ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. गैरप्रकारांवर नजर ठेवण्यात येणार आहे. उमेदवारांनी मध्यस्थांच्या भूलथापांना बळी पडू नये. गैरप्रकार आढळून आल्यास त्वरित मोबाईल क्रमांक -७३९१०८२६११ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अतिरिक्त पोलिस आयुक्त संजय पाटील यांनी केले आहे.
How to Download Pune Police Bharti Groud Admit Card (Step-by-Step)
While the official portal releases cards in batches, here is the standard procedure to follow:
- Visit the Official Website: Go to the official Maharashtra Police Recruitment portal (typically mahapolice.gov.in or the specific policerecruitment2025.mahait.org link provided during registration).
- Login: Enter your Username and Password created during the application process.
- Check Notifications: Look for the “Pune City Police” or “Jail Department” admit card link in your dashboard.
- Download/Print: Once the card appears, click “Download” and ensure you print at least two copies.
- Watch for Alerts: According to Addl. Commissioner Sanjay Patil, candidates will also receive updates via SMS/Email regarding their specific slot.
1 thought on “पुणे शहर पोलिस दलातील पोलिस भरतीप्रक्रियेची सुरुवात १६ फेब्रुवारीपासून होणार,प्रवेश पत्र डाउनलोड करा | Pune Police Bharti Ground Exam Date and Admit Card”