Ladki bahin 6000 Rupees Payment Date – An important news has come out for the beloved sisters Ladki Bahin For Latest Payment Update of 6000 Rupees. According to the information received, the beloved sisters will get a whopping six thousand rupees in one go! An important news has come out for all the women beneficiaries of the ‘Mukhyamantri Majhi Ladki Bahin’ scheme in Maharashtra. Completing e-KYC has now become mandatory to get the monthly benefit of the scheme (₹1,500). Only women who have successfully completed e-KYC will get the benefit of the scheme regularly. Also, after completing this process, some women will get Rs 6000. Let’s find out which women are included in it and this news is a good news for all the beloved sisters. Now you must have a big question on which date this money will be deposited in the account and how, let’s see the complete information about this!
लाडक्या बहिणींसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. प्राप्त माहिती नुसार लाडक्या बहिणींना तब्बल सहा हजार रुपये एकसोबत मिळणार आहेत! महाराष्ट्रातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. योजनेचा मासिक लाभ (₹१,५००) मिळवण्यासाठी ई-केवायसी (e-KYC) पूर्ण करणे आता पूर्णपणे अनिवार्य झाले आहे. फक्त ई-केवायसी यशस्वीपणे पूर्ण केलेल्या महिलांनाच योजनेचा लाभ नियमितपणे मिळेल. तसेच ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर काही महिलांना 6000 रुपये मिळणार आहेत. त्यामध्ये कोणत्या महिलांचा समावेश आहे चला जाणून घेऊया आणि हि बातमी सर्व लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता हे पैसे कोणत्या तारखेला खात्यात जमा होणार आणि कसे हा मोठा प्रश्न आपल्याला पडला असेलच, चला तर या बद्दल पूर्ण माहिती बघूया!
पोलीस भरती पुढील लेखी परीक्षेस उपयुक्त टेस्ट सिरीज, रोज नवीन पेपर्स लगेच सोडवा

तर महत्वाचे म्हणजे ज्या महिलांनी ई-केवायसी पूर्ण केले नाही किंवा त्यात त्रुटी असल्याने डिसेंबर २०२५ पासून त्यांचा लाभ थांबला आहे. त्यांना प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रलंबित हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ, ४ महिन्यांचे हप्ते असल्यास सुमारे ६,००० (प्रति महिना ₹१,५०० × ४) एकाच वेळी खात्यात जमा होऊ शकतात. मात्र, हे प्रलंबित हप्ते मिळण्यासाठी ई-केवायसी दुरुस्ती आवश्यक आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी घोषित केल्याप्रमाणे, ई-केवायसीमध्ये दुरुस्ती करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०२६ आहे. ही मुदत डिसेंबर २०२५ नंतर वाढवण्यात आली आहे (मूळ मुदत डिसेंबर २०२५ पर्यंत होती). या तारखेनंतर दुरुस्तीची कोणतीही संधी मिळणार नाही आणि लाभ कायमचा थांबू शकतो. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींना प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत लाभ वितरित होईल, असा शासन निर्णय झाला आहे. राज्यातील सव्वादोन कोटी पात्र लाडक्या बहिणींसाठी दरमहा सरासरी ३२०० कोटी रुपये लागतात. मात्र, डिसेंबरपासून लाडक्या बहिणींसाठी निधी मिळालेला नाही. आता ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी परिपूर्ण तथा अचूक झाली आणि निकषांनुसार त्या योजनेच्या लाभासाठी पात्र ठरत असतील तर त्यांना लाभ मिळेल, अशी चर्चा आहे.
या साठी सर्व बहिणींनी लवकरात लवकर अधिकृत पोर्टल ladakibahin.maharashtra.gov.in किंवा ई-केवायसी विभागावर जा. आपली माहिती तपासा आणि चुका (उदा. आधार लिंक, पर्याय निवड, इ.) दुरुस्त करा. सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे द्या जेणेकरून भविष्यात अडचणी येणार नाहीत. प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर स्टेटस तपासा आणि पावती/कन्फर्मेशन सेव्ह करा. या संधीचा फायदा घ्या आणि योजनेचा लाभ नियमित मिळवा! अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइट किंवा हेल्पलाइनचा संपर्क साधा.
अनेक महिलांच्या ई-केवायसी प्रक्रियेत तांत्रिक चुका किंवा चुकीचे पर्याय निवडले गेल्याने (उदा. सरकारी नोकरी किंवा पेन्शन असल्याचे चुकीचे निवडणे) लाभ रखडला आहे किंवा थांबला आहे. अशा महिलांसाठी सरकारने ऑनलाइन पोर्टलद्वारे दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही दुरुस्ती आता ऑनलाइन पद्धतीने करता येईल. यापूर्वी अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी करण्याची योजना होती, पण आता ती रद्द करण्यात आली आहे आणि ऑनलाइन प्रक्रियेवर भर देण्यात आला आहे. तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थीच्या कुटुंबाचे वार्षिक अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे, त्यांच्याकडे चारचाकी वाहन नसावे, ती सरकारी नोकरदार नसावी, एकाच कुटुंबातील दोन लाभार्थी (एक विवाहित व एक अविवाहित) असाव्यात, लाभार्थीचे वय २१ ते ६५ वर्षांपर्यंतच असावे, अशा प्रमुख अटी आहेत. मात्र, योजनेच्या निकषांना फाटा देऊन अनेक महिलांनी लाभ घेतला. आता ई-केवायसी व पडताळणीअंती अपात्र ठरणाऱ्या लाडक्या बहिणींची संख्या खूप मोठी असू शकते, असे मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
So as per the Latest Update & News this Summery is for you, Aditi Tatkare, Maharashtra’s women and child development minister, reiterated that Mukhyamantri Majhi Ladki Bahin beneficiaries who made mistakes while completing their eKYC process can rectify their mistakes by March 31, 2026. Many Mukhyamantri Majhi Ladki Bahin beneficiaries while completing their e-KYC process, selected the wrong options through given website link leading to complaints and difficulties in receiving Payment under ladki Bahin Yojana 2026.
1 thought on “महत्वाची बातमी! लाडक्या बहिणींना मिळणार 6000 हजार रुपये, या दिवशी होणार जमा Ladki bahin 6000 Payment Date”
Very nice ☺️