Maharashtra ZP Bharti 2026 – Friends, for many days, many candidates have been waiting for the Zilla Parishad recruitment advertisement. Amidst this, some good news has emerged. In Raigad Zilla Parishad, which is responsible for the overall development of rural areas, the large number of vacant posts in various departments has created an additional workload on the administration. Out of the 11,555 sanctioned posts in the Zilla Parishad, a staggering 2,609 posts are currently vacant, and the Zilla Parishad administration is demanding that these posts be filled immediately. Therefore, there are signs that this recruitment process will begin soon under Maharashtra ZP Bharti 2026.
ZP Bharti 2026 Starting Date will be aroud the March 2026. Exact Date will be out Soon. But yet exact date is not published by department. For More Updates keepvisiting us for Maharashtra ZP Bharti 2026 Latest Update & Starting Date 2026.
मित्रांनो, अनेक दिवसापासून भरपूर उमेदवार जिल्हा परिषद भरतीची जाहिरातीच्या प्रतीक्षेत आहे. यातच एक चांगली बातमी समोर आली आहे. ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी असलेल्या रायगड जिल्हा परिषदेत विविध विभागांतील मोठ्या प्रमाणावरील रिक्त पदांमुळे प्रशासनावर कामाचा अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे. जिल्हा परिषदेत मंजूर असलेल्या ११ हजार ५५५ पदांपैकी तब्बल दोन हजार ६०९ पदे सध्या रिक्त असून, ही पदे तातडीने भरण्याची मागणी जिल्हा परिषद प्रशासनाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे हि भरती प्रक्रिया लवकरच सुरु होण्याची चिन्हे आहेत. आणि हो मित्रानो, पोलीस भरतीची मोफत टेस्ट सिरींज या लिंकवर उपलब्ध आहे, तेव्हा आपल्या सर्व मित्रांना शेयर करायला विसरू नका!

महाराष्ट्रातील रायगड जिल्हा परिषदेचा कारभार गेल्या तीन वर्षांपासून प्रशासकांच्या माध्यमातून सुरू आहे. जोपर्यंत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होत नाहीत, तोपर्यंत जिल्हा परिषदेच्या दैनंदिन कामकाजाची संपूर्ण जबाबदारी प्रशासकांवरच आहे. मात्र, मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे असल्याने सध्या कार्यरत असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त भार पडत आहे. या नवीन भरती मुले साहजिकच हा प्रश्न सुटणार आहे. जिल्हा परिषदेत गट ‘ब’, ‘क’ व ‘ड’ संवर्गातील पदे रिक्त आहेत. सध्या रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे जिल्हा परिषदेचा कारभार सांभाळत आहेत. जिल्हा परिषदेत विविध विभागांतील रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू असून, ही प्रक्रिया लवकर पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. रिक्त पदे भरल्यास प्रशासन अधिक सक्षम होऊन ग्रामीण भागातील विकासकामांना गती मिळणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
शिक्षण विभागात सर्वाधिक रिक्त पदे – Maharashtra ZP Bharti 2026 Number of Posts
गट ‘ब’ संवर्गात सामान्य प्रशासन विभागातील सामान्य लघुलेखक तीन, वित्त विभागातील सहाय्यक लेखाधिकारी सात, बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता ३४, ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंता ५४, शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी ४६, केंद्रप्रमुख १३२ तसेच प्राथमिक मुख्याध्यापकांची ९५ पदे रिक्त असून, एकूण ३७१ पदांचा यात समावेश आहे.
‘क’ संवर्गात २,०५० रिक्त पदे Group C ZP Bharti 2026
गट ‘क’ संवर्गात सर्वाधिक रिक्त पदे असून, एकूण २,०५० पदे रिक्त आहेत. यामध्ये सामान्य प्रशासन विभाग १६४, वित्त विभाग १९, ग्रामपंचायत विभाग ८६, आरोग्य विभाग ६४०, बांधकाम विभाग ८७, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग एक, पशुसंवर्धन विभाग २५, प्राथमिक शिक्षण विभाग ९८१ तसेच महिला व बालकल्याण विभागातील ३६ पदांचा समावेश आहे.
‘ड’ संवर्गात १९२ रिक्त जागा Maharashtra ZP Group D Bharti 2026
त्याचप्रमाणे गट ‘ड’ संवर्गातही १९२ पदे रिक्त असून, त्यामध्ये सामान्य प्रशासन विभागातील १३८, पशुसंवर्धन विभागातील चार, आरोग्य विभागातील २० व बांधकाम विभागातील ३० पदांचा समावेश आहे.
5 thoughts on “जिल्हा परिषदेत २,६०९ रिक्त पदांची भरती, जाणून घ्या नवीन अपडेट! – Maharashtra ZP Bharti 2026”
Hie
जिल्हा परिषद पंदाची भरती डिप्लोमा (इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल ) इंजिनियर या पदवीधारक (मुली/ मुलानं )जिल्हा परिषदेत गट ‘ब’, ‘क’ व ‘ड’ संवर्गातील रिक्तपंदासाठी.फॉर्म भरता येणार आहेत का यांची माहिती हवीआहे
Maharashtra ZP Bharti 2026 baddal chan mahiti… thanks…
For Art Teacher Job
In ZP High School
ATD(Art Teacher) Complete course in Beed College…
G.D.Art (Professor Course Complete)
In Mumbai College….