MSRTC राज्य परिवहन महामंडळात नवीन पदभरती सुरु, नोकरीची मोठी संधी! – Maharashtra MSRTC Bharti Process

Maharashtra MSRTC Bharti Process – MSRTC राज्य परिवहन महामंडळात नवीन पदभरती सुरु, नोकरीची मोठी संधी! – मित्रांनो, एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मागील बरेच वर्षांपासून आपण MSRTC मध्ये नोकरीच्या संधीची वाट बघत असाल. यातच एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या लातूर विभागात सन 2025-2026 मधील भाग 2 सत्रासाठी वेगवेगळ्या व्यवसायासाठी 65 शिकाऊ उमेदवारांची (प्रशिक्षणार्थी) पदे ऑनलाईन पध्दतीने भरली जाणार आहेत. यामध्ये मोटार मेकॅनिक (यांत्रिक मोटारगाडी एमएमव्ही) 41 पदे, मोटारगाडी साठाजोडारी (एमव्हीबीबी) (शिट मेटल वर्क्स) 13 पदे, मेकॅनिक ॲटो इलेक्ट्रीकल ॲन्ड इलेक्ट्रीशियन (विजतंत्री) 7 पदे, सांधाता (वेल्डर) गॅस ॲन्ड ईलेक्ट्रीकल 1, पदे आणि मेकॅनिक रेफ्रिजरेशन ॲन्ड एअर कंडिशनर (प्रतिशन व वातानुकूलिकरण टेक्निशियन) 1 पदे अशी एकूण 65 पदे भरावयाची आहेत. हि भरती म्हणजे एक मस्त संधी आहे. या द्वारे आपल्या करियरला एक मोठा बुस्टर मिळणार आहे. चला तर या बद्दल पूर्ण माहिती जाणून घेऊया!

तर मित्रांनो, या भरती साठी अर्ज सादर करण्यासाठी, संबंधित व्यवसायातील दहावी पास, आय.टी.आय (एनसीव्हीटी) किंवा विहित व्यावसायात व्होकेशनल अभ्यासक्रम (एमएसबीएसव्हीईटी) पूर्ण केलेल्या, तसेच यांत्रिकी प्रवर्गातील अभियांत्रिकी पदवीधर, पदविका या पदांसाठी केवळ आयटीआय उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांनी सर्वप्रथम एनएपीएस वेब पोर्टलवरील www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर आणि अभियांत्रिकी पदवीधर, अभियांत्रिकी पदविकासाठी एनएटीएस-2.0 पोर्टलवरील www.nats.education.in या संकेतस्थळावर 13 ते 22 फेब्रुवारी 2026 या कालावधीत ऑनलाईन नोंदणी करून एमएसआरटीसी डिव्हिजन लातूर (MSRTC Division Latur) E001172700461 या आस्थापनेसाठी (Establishment) ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. हि लिंक आम्ही खाली दिली आहे.

तसेच लक्षात ठेवा,ऑनलाईन नोंदणी केलेल्या उमेदवारांनी लातूर विभागीय कार्यालयात उपलब्ध करून दिलेले छापील अर्ज भरावेत. हे छापील अर्ज लातूर शहरातील जुना रेणापूर नाका येथील राज्य परिवहन लातूर विभागीय कार्यालय आस्थापना शाखा येथे शनिवार व रविवार वगळून 23 ते 28 फेब्रुवारी 2026 या कालावधीत सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत मिळतील व लगेच स्विकारले जातील. या अर्जासोबत (जीएसटी 18 टक्के सहित) खुल्या प्रवर्गाकरीता 590 रुपये व मागासवर्गीयांसाठी 295 रुपयेचा धनादेश किंवा आयपीओ (इंडियन पोस्टल ऑर्डर) एमएसआरटीसी फंड अकाऊंट लातूर (MSRTC Fund Account Latur) या नावाने अर्ज घेतेवेळी सोबत असणे आवश्यक आहे.

 

MSRTC Bharti 2026 Application Form Date

13 ते 22 फेब्रुवारी 2026 या कालावधीनंतर ऑनलाईन नोंदणी करणाऱ्या उमेदवारांच्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही, असे अर्ज रद्द समजले जातील. अशा उमेदवारांना कार्यालयाचा छापील नमुन्यातील अर्ज देण्यात येणार नाही. जे उमेदवार 28 फेब्रुवारी, 2026 रोजी वेळ दुपारी 3 वाजेपर्यंत कार्यालयाचे विहित नमुन्यातील अर्ज सादर करणार नाहीत, त्यांचा शिकाऊ उमेदवार भरतीसाठी विचार केला जाणार नाही, असे लातूर राज्य परिवहन विभाग नियंत्रक यांनी कळविले आहे.

1 thought on “MSRTC राज्य परिवहन महामंडळात नवीन पदभरती सुरु, नोकरीची मोठी संधी! – Maharashtra MSRTC Bharti Process”

Leave a Comment

Table of Contents